Talwade: बँक खाते फ्रीज झाल्याचा बहाणा करत व्यावसायीकाची चार लाखाची फसवणूक
एमपीसी न्यूज – बँक खाते फ्रीज झाले आहे सांगत एका कापड (Talwade)व्यावसायीकाची 4 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 2 ते 4 जानेवारी 2024 या कालावधीत रुपीनगर, तळवडे येथे घडली आहे.
याप्रकरणी सागर वसंत म्हस्के (वय 26 रा. रुपीनगर, तळवडे) 7003645106 या मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने संबंधित क्रमांकावरून (Talwade)फिर्यादीला फोन करून फिर्यादीच्या इंडसंड बँकेची माहिती सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करून तुमचे खाते फ्रीज झाले आहे ते अनफ्रीज करावयाचे सांगून माहिती घेतली.
Talwadeया नंतर फिर्यादीला लिंक पाठवली फिर्यादी यांनी लिंक ओपन केली. यावेळी काही बदल करण्याचा बहाणा करत त्यांने फिर्यादीच्या बँक खात्यातून 4 लाख 14 हजार 800 रुपये परस्पर काढून घेतले. यावरून चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.