Pimpri: अंमली पदार्थ विक्री प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलीस कर्मचाऱ्यासह एकाला अटक, 45 कोटी रुपयांचे एमडी जप्त

एमपीसी न्यूज –  कुंपणच शेत आकत असल्याचा धक्कादायक प्रकार (Pimpri)पिंपरी-चिंचवड येथे घडला.पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत पोलिसांनी एका 32 वर्षीय तरुणाकडून 45 कोटी रुपयांचे एम.डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीसांचा एक कर्मचारीच यात सहभागी असल्याचे उघड झाले.

नमामी शंकर झा (वय 32, मूळचा बिहार, सध्या रा. निगडी) असे एमडी सह अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे तर विकास शेळके असे अटक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.शेळके हा निगडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.1) पहाटे अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाईला सुरुवात केली. पिंपळे निलख येथे गस्त घालत असताना हातामध्ये पांढरी पिशवी घेवून एकजण संशयीतरित्. वावरत होता. पोलिसांना पाहताच तो घाईघाईत निघून जात होता.
पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. यावेळी (Pimpri)त्याने त्याचे नाव नमामी शंकर झा असल्याचे सांगितले. त्याच्याकडून पोलिसांनी त्याच्याकडून 2 कोटी रुपये किमतीचे 2 किलो व 38 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. जसजसा तपास पुढे सरकत गेला तसतसा या प्रकरणात शेळके यांचा थेट सहभाग उघड झाल्याने मोठा खळबळ उडाली आहे.

निगडी पोलिस ठाण्यात तैनात असलेले पोलिस अधिकारी विकास शेळके यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने ताब्यात घेतले आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केल्यानंतर मध्यरात्री शेळके याला अटक करण्यात आली, त्यानंतर त्याच्याकडून 44.50 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.

असे या कारवाईत एकूण 44 कोटी 79 लाख 80 हजार रुपयांचे 44 किलो 790 रुपयांचे एमडीजप्त करण्यात आले.शेळके यांना न्यालयीन कोठडीसाठी हजर कऱण्यात येणार आहे. पुण्यातील ड्रग्स रॅकेट प्रकरणा नंतर आता पिंपरी-चिंचवड येथे तर थेट पोलीस कर्चाऱ्याचाच सहभाग असल्याचे उघड झाल्याने ड्रग्सचे पुणे व आसपासच्या परिसरात पसरलेल्या जाळ्याची घट्ट पकड निदर्शनास येत आहे.

ही कारवाई अमंली पदार्थ विरोधी पथकाचे वरीष्ट पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, सचिन कदम, पोलीस हवालदार मोरे, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे व इतर स्टाफ यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.