Bhosari : महिलांसाठी महिलांकडून महिला दिनानिमित्त महिलांचा ‘कीर्तन जागार’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच जागतिक महिला दिन (Bhosari)आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने भोसरीत महिलांकडून महिलांसाठी महिला दिनानिमित्त महिला कीर्तनकारांकडून ‘शिव-शक्ती’चा जागर होणार आहे. हा अध्यात्मिक सोहळ्याच्या आयोजनासाठी पूर्णत: महिला स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला आहे.

महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि शिवांजली सखी मंच्या पुढाकाराने(Bhosari) प्रतिर्षी जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात. यावर्षी महाशिवरात्री आणि महिला दिन एकाच दिवशी आल्याचा दुग्धशर्करा योग आहे. या निमित्ताने आयोजकांनी भव्य कीर्तन महोत्सव- 2024 आयोजित केला आहे.

 

Bhosari : शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी ज्येष्ठ पत्रकार अनिल कातळे

भोसरीतील महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या मैदानावर शनिवार, 2 मार्च ते दि. 9 मार्च असे आठ दिवस हा भक्तीमय सोहळा रंगणार आहे. रोज सायंकाळी 5 ते 6 या वेळेत हरिपाठ आणि 7 ते 9 यावेळेत कीर्तन होणार आहे. बार्शी येथील ह.भ.प. शिवलीलाताई पाटील, बीड येथील ह.भ.प. परमेश्वरीताई परभणे, नाशिक येथील ह.भ.प. ज्ञानेश्वरीताई बागुल, भिवंडी येथील ह.भ.प. वनिताताई पाटील, ह.भ.प. शालिनीताई देशमुख-इंदोरीकर, खेड येथील ह.भ.प. सुप्रियाताई साठे-ठाकूर, सासवड येथील ह.भ.प. गीतांजलीताई झेंडे आणि बीड येथील ह.भ.प. सोनालीताई करपे कीर्तनसेवा करणार आहेत. बीड येथील अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था कीर्तन साथ देणार आहे. तसेच, मृदुंगाचार्या ह.भ.प. यशोदाताई सोळुंके याही योगदान देणार आहेत.

माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे, तसेच, पठारे-लांडगे तालीम मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, वैष्णव विचार कीर्तन महोत्सव संस्था, भोजेश्वर मित्र मंडळ, माळी-आळी मित्र मंडळ, संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय-तुकोबाराय प्रतिष्ठान, नामस्मरण भजनी मंडळ, जय हनुमान मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, श्री संत सावता माळी महाराज प्रतिष्ठान यांच्यासह समस्थ भोसरी आणि पंचक्रोशीतील भाविक-भक्त या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.