Punawale : बनावट नावाने झूमकार कंपनीकडून नेलेल्या कारचा अपहार

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीने बनावट नावाने झूमकार कंपनीकडे ऑनलाईन माध्यमातून कार बुक केली. त्यासाठी आगाऊ रक्कम भरली आणि 20 लाखांची कार घेऊन जात फसवणूक केली. हा प्रकार 5 मे रोजी सकाळी पुनावळे (Punawale) येथे घडला असून याप्रकरणी 30 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

उपेंद्र शिरीष कुलकर्णी (वय 27, रा. पुनावळे) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नुरुल हक जे चौहान उर्फ सुफीयान (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची एमजि हेक्टर कार (एमएच 15/एचजी 2828) झूमकार कंपनीकडे भाड्याने देण्यासाठी लावली होती. आरोपीने बनावट नावाने झूमकार कंपनीच्या अॅपमध्ये माहिती भरून फिर्यादी यांची कार बुक केली.

त्यासाठी त्याने कंपनीकडे 12 हजार 407 रुपये आगाऊ रक्कम देखील भरली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांची 20 लाख रुपये किमतीची कार घेऊन जात ती परत न देता तिचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.