Punawale :पाचव्या मजल्यावरून पडुन कामगाराचा मृत्यू, कंत्राटदारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बांधकाम साईट वर काम करत असताना (Punawale)कामगाराचा पाचव्या मजल्यावरून पडुन मृत्यू झाला आहे. ही घटना पूनावळे येथील शाईन साईट, पूनावळे येथे घडली.

या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.31) सुपरवायजर (Punawale)राजू हिरालाल साहू (वय 34) यांनी फिर्याद दिली आहे.यावरून धारया मोतीलाल नाईक (वय 48 रा. बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari : लघुशंकेसाठी थांबणे पडले महागात, दुचाकीच्या डिक्कितून 5 लाख रुपये गेले चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाईन साईट वर काम करत असताना रविकुमार सुनीलकुमार निर्मलकर (वय 19) याचा पाचव्या मजल्यावर काम करत असताना तोल गेला व त्याचा खाली पडून मृत्यू झाला. यावेळी कामगारांना सुरक्षा जाळी,हेल्मेट अशी कोणतीच सुरक्षेची साधने पुरवली नाहीत म्हणून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.