Bhosari : लघुशंकेसाठी थांबणे पडले महागात, दुचाकीच्या डिक्कितून 5 लाख रुपये गेले चोरीला

एमपीसी न्यूज – कामगारांच्या पगाराचे (Bhosari) पैसे घेऊन जात असताना लघुशंकेसाठी थांबणे एका कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले आहे. कारण या दरम्यान त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत असलेले 5 लाख रुपये चोरांनी चोरून नेले आहेत. ही घटना 25 जानेवारी रोजी भोसरी येथील इंद्रायणी नगर परिसरात घडली.

या प्रकरणी बुधवारी (दि.31) योगेश पोपट लांडे (वय 32 रा भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अनोळखी चोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kalewadi : भिशीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कंत्राटदार असून ते कामगारांचा (Bhosari) पगार घेऊन त्यांच्या मोपेड वरून जात होते. यावेळी ते लघुशंकेसाठी थांबले असता चोरांनी त्यांच्या गाडी मधून तब्बल 5 लाख रुपये चोरून नेले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.