Bhosari : भरधाव बुलेटची दुभाजकाला धडक; तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  रविवारी (दि. 6) सकाळी सात वाजता पुणे नाशिक महामार्गावर भोसरी येथे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने  दुभाजकाला (डीव्हायडर) धडकली. यामध्ये तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. 
ओंकार सोमनाथ नाठे (वय 20, रा. डुडुळगाव. मूळ रा. नाशिक) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Nagpur : डॉक्टर नसलो तरी दीड वर्षापूर्वी काही लोकांचे मोठे ऑपरेशन करून गळ्यातील पट्टे उतरविले – मुख्यमंत्री शिंदे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार याने त्याच्या ताब्यातील बुलेट भरधाव वेगात चालवली. पुणे – नाशिक महामार्गावरून बुलेटवरून जात असताना भोसरी येथे त्याचे बुलेट वरील नियंत्रण सुटले त्यामुळे  त्याची बुलेट डिव्हायडरला धडकली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने (Bhosari) त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.