Nagpur : डॉक्टर नसलो तरी दीड वर्षापूर्वी काही लोकांचे मोठे ऑपरेशन करून गळ्यातील पट्टे उतरविले – मुख्यमंत्री शिंदे

एमपीसी न्यूज : मी डॉक्टर नसताना  काही लोकांच्या गळ्यातील आणि कमरेचे पट्टे उतरवून टाकले असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. ते आज नागपूर येथील वैद्यकीय व्यावसायिकांशी संवाद साधताना बोलत होते.

आज (दि. 7 एप्रिल) नागपूर येथे वैद्यकीय व्यावसायिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, समाजात डॉक्टरकडे परमेश्वराचे रूप म्हणून बघितलं जाते. आपण सर्व सामान्य लोक हे रोज अनुभवत असतो. प्रत्येक डॉक्टरला आपला रुग्ण सुखरूप घरी जावा असे वाटत असते. मी कोरोनाकाळात थोड्या कालावधीसाठी आरोग्य मंत्री असताना खूप ठिकाणी जायचो. प्रत्येक ठिकाणी भेटी दिल्या आणि डॉक्टरांशी (Nagpur)  संवाद साधला. डॉक्टर हे देवदूतासारखे काम करत असतात आणि कितीही दुर्गम भाग असेल तरी तेथे ते सेवा देत असतात हे मी स्वतः अनुभवले.

Pimpri : पिंपरी विधानसभा क्षेत्रातून चार हजारपेक्षा जास्त सूचना पंतप्रधान मोदी यांच्याकडे जाणार – अमित गोरखे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, रामटेक लोकसभेतून कृपाल तुमाने (Ramtek) यांना मी तुम्ही ह्यावेळेस लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत असे सांगितले आणि त्यांनी ते ऐकले. मी तुमाने यांना खासदारहून मोठा मान देणार आहे. कृपाल तुमाने यांच्या जागी राजू पारवे यांना ह्या वेळेस शिवसेनेने  रामटेक लोकसभेतून  संधी दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.