Pimpri : पिंपरी विधानसभा क्षेत्रातून चार हजारपेक्षा जास्त सूचना पंतप्रधान मोदी यांच्याकडे जाणार – अमित गोरखे

एमपीसी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांच्या संपर्क अभियानातून निगडीपासून ते दापोडीपर्यंत नरेंद्र मोदीजी  पुन्हा एकदा पंतप्रधान झाल्यास कुठल्या प्रकारच्या केंद्रीय योजना पिंपरी विधानसभेत हव्या आहेत याची विचारणा नागरिकांकडे केली असता नागरिकांनी 4000 हून अधिक सूचना लेखी स्वरुपात दिल्या आहेत.

IPL : आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये क्रिकेटचा सामना वानखेडे स्टेडीयम येथे रंगणार

याविषयी अधिक माहिती देताना अमित गोरखे म्हणाले की,आगामी काळात पंतप्रधान मोदी यांचे तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यानंतर (Pimpri) विधानसभेतील विकासकामासाठी  सर्वसामान्य  नागरिकांकडून (Pimpri) सूचना गोळा करण्यात आल्या.  ह्या सर्व सूचना गोळा करण्यासाठी सर्व भाजप पदाधिकाऱ्यांचे (Pimpri)  खूप सहकार्य लाभले. सर्व सूचनांची पेटी (बॉक्स)  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या सर्व सूचना  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ह्यांना सुपूर्द करत असताना  मावळचे खासदार  बारणे, शहराध्यक्ष  शंकरभाऊ जगताप, आमदार अश्विनीताई जगताप,आमदार सौ.उमाताई खापरे,आमदार बाळा भेगडे,  प्रशांत ठाकुर, सदाशिव खाडे, राजेश पिल्ले,अनुप मोरे, बाळासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते..

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.