IPL : आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये क्रिकेटचा सामना वानखेडे स्टेडीयम येथे रंगणार

एमपीसी न्यूज : भारतात चालू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग (IPL) मध्ये अतिशय चुरशीचे क्रिकेटचे सामने  गेल्या 15 दिवसांपासून                        पाहायला मिळत आहेत. आपली पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी मुंबई इंडियन्स  आज  ( दि. 7 एप्रिल)  दिल्ली  कॅपिटल्स संघाला घरच्या मैदानावर हरवून  इंडियन प्रीमिअर लीग(IPL) च्या गुणतालिकेत आपले खाते उघडेल का असा प्रश्न क्रिकेट रसिकांना पडला आहे.   

Hinjawadi : स्पा सेंटर मध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांच्या कारवाईत तीन महिलांची सुटका

 

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स  संघामधील लढत आज ( दि. 7 एप्रिल) भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता  वानखेडे स्टेडीयमवर  होणार आहे. आत्तापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झाला असून दिल्ली कॅपिटल्सने     एकूण खेळलेल्या 4 सामन्यामध्ये 3 सामने जिंकलेले आहेत तर एका सामन्यात पराभव झालेला आहे. आज मुंबई इंडियन्स आपल्या घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे प्रेक्षकांचा पाठिंबा त्यांना नक्कीच मिळेल. तसेच मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्सचे पारडे जड झाल्याचे समजते.

     

इंडियन  प्रीमियर लीगचा 17 व्या मोसमातील सर्व क्रिकेटचे सामने अतिशय रंगतदार पाहायला   मिळत आहेत तसेच क्रिकेट रसिकांकडून आयपीएल मधील सर्व सामन्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे.  उन्हाळ्याची सुट्टी चालू झाल्यामुळे ‘ एज्युकेशन  स्पोर्ट्स अँड  ऑल ‘ या संस्थेने पुढकार घेऊन मुंबईतील २० हजार विद्यार्थ्यांना उभय संघातील लढत पाहण्याची सोय वानखेडे स्टेडीयमवर केली आहे. त्यानुसार बेस्टच्या तब्बल ५०० एसी आणि नॉनएसी बसेसची सोय करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.