Sangvi : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत पंधरा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत त्यांच्याकडून 15 लाख रुपये घेत त्यांची  (Sangvi) फसवणूक केली. ही घटना एक फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत घडली.
योगेश सुरेश साहू (वय 37, रा. सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रॉबर्ट एडरसन, प्रिया यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpur : डॉक्टर नसलो तरी दीड वर्षापूर्वी काही लोकांचे मोठे ऑपरेशन करून गळ्यातील पट्टे उतरविले – मुख्यमंत्री शिंदे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रिया यादव हिने फेसबुक वरून साहू  (Sangvi) यांच्याशी संपर्क केला. साहू यांना एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करून त्यांना एससीआयई नावाचे ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. साहू (Sangvi)  यांनी आरोपींना वेगवेगळ्या बँक खात्यांवर 15 लाख रुपये पाठवले. त्यांनी पाठवलेले पैसे परत न देता आरोपींनी त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.