India News : आघाडी करणार ‘जीतेगा भारत’ टॅगलाईनखाली प्रचार; भाजप विरोधात 26 पक्ष उतरले आखाड्यात

एमपीसी न्यूज – बंगळूरू येथे मंगळवारी (दि. 18) झालेल्या 26 पक्षांच्या बैठकीत, विरोधकांनी 2024 च्या लोकसभा (India News) निवडणुकांसाठी त्यांच्या युतीचे नाव ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (INDIA) असे ठरवले.

राहुल गांधी यांनी घोषणा केलेल्या या नावाला सर्वांनी संमती देत आमची लढाई देशासाठी असल्याचे जाहीर केले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्ष ‘जीतेगा भारत’ या टॅगलाइनसह प्रचार करणार आहेत. याबाबतचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

Khed : धक्कादायक…रेटवडी स्मशानभूमीत अघोरी कृत्य ; बोकडाचे मुंडके व पाय ठेवले कापून

बंगळुरूमध्ये झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तामिळ नंदूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, उबाथा प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सचिव सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष सचिव डी. राजा, आदी उपस्थित होते.

एकत्रित आले 26 पक्ष

काँग्रेस, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम, आम आदमी पार्टी , जनता दल, राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोक दल, अपना दल, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशन, क्रांतिकारी समाजवादी पक्ष , ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, मरुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम, विदुथलाई चिरुथाईगल काची, कोंगुनाडू मक्कल देसिया काची,  मक्कल कच्ची, इंडियन युनियन मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस (एम),केरळ काँग्रेस (जोसेफ)

 

व्हिसिकेचे प्रमुख थोल थिरुमावलावन यांच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बेंगळुरू येथे 26 “समविचारी” पक्षांच्या एकत्रित विरोधी पक्षांच्या बैठकीत या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. एका महत्वाच्या घोषणेमध्ये हे देखील सांगण्यात आले की पुढची बैठक ही महाराष्ट्रामध्ये होणार आहे व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) त्या बैठकीचे आयोजन करणार आहे.

“नकारात्मकतेवर बांधलेल्या युती कधीच जिंकत नाहीत” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. जेव्हा युती घराणेशाही आणि भ्रष्ट असेल तेव्हा देशाचे नुकसान होईल,  असेही ते म्हणाले. INDIA नावावरही पंतप्रधान मोदींनी टीका केली.

युतीच्या नावाची घोषणा करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेता ममता बॅनर्जी म्हणाल्या, “भाजप.. तुम्ही ‘INDIA’ला आव्हान देऊ शकता का? आम्ही आमच्या मातृभूमीवर प्रेम करतो. आम्ही देशभक्त नागरिक आहोत.

 

आम्ही शेतकरी, दलित आणि हा देश तसेच जगासाठी उभे आहोत. सध्या केंद्र सरकार केवळ राज्य सरकारे खरेदी करते आहे किंवा त्यांची विक्री करते आहे. या लढ्यामध्ये ‘INDIA’, आमचा देश जिंकेल अन् भाजप हरेल”

 

काँग्रेस प्रमुख नेते व माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, “भाजपच्या विचारधारेविरोधातील हा लढा असून ते या देशावर आक्रमण करत आहेत. देशात बेरोजगारी वाढली असून देशातील लाखो लोकांची संपत्ती पंतप्रधान आणि भाजपच्या काही मोजक्या मित्रांच्या हातामध्ये जाते आहे. आम्ही राज्यघटना, भारतीयांचा आवाज  आणि ‘आयडिया ऑफ इंडिया’ चे संरक्षण करीत आहोत. हा ‘INDIA’ आणि भाजपमधील तसेच ‘INDIA’ आणि मोदी यांच्यातील संघर्ष आहे. ”

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, ” काही लोक म्हणतात आम्ही कुटुंबासाठी लढत आहोत त्यांना हे माहिती असायला हवे की हा देशच आमचे कुटुंब असून आम्ही आमच्या या कुटुंबासाठी लढा देत आहोत. आम्हा विरोधी पक्षांचा हा लढा एका व्यक्तीविरोधात नसून तो हुकूमशाहीविरोधात आहे. आता पुढे काय होईल म्हणून लोक घाबरले आहेत. पण त्यांनी काळजी करू नये, आम्ही सगळे आहोत.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.