Punawale : भूमिगत विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भूमिगत विद्युत वाहिनीची कल्पना ( Punawale) न मिळाल्याने खोदकाम करत असलेल्या एका कामगाराला शॉक लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 17) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास कोयते वस्ती पुनावळे येथे घडली.

गोपाळ बालाप्पा आय्याळी (वय 21, रा. बिजलीनगर चिंचवड) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी रवी कोटरप्पा बजलवार (वय 25, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाघेरे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), सिद्धेश महादेव तांडेल (वय 27) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या नियामक मंडळ सदस्य पदी रणजित काकडे यांची निवड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा गोपाळ हे सोमवारी कोयते वस्ती पुनावळे येथे खोदकाम करीत होते. त्यावेळी आरोपींनी गोपाळ यांना भूमिगत विद्युत वाहिनीची माहिती दिली ( Punawale) नाही. त्यामुळे खोदकाम करताना विजेचा धक्का लागून गोपाळ यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.