Khed : धक्कादायक…रेटवडी स्मशानभूमीत अघोरी कृत्य ; बोकडाचे मुंडके व पाय ठेवले कापून

रेटवडी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

एमपीसी न्यूज : रेटवडी , ता खेड (Khed) , जि. पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत बोकडाचे मुंडके व पाय कापून ठेवल्याचे धक्कादायक अघोरी कृत्य करण्यात आले आहे. सोमवारी १७ जुलै रोजी रात्री हा प्रकार घडला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Chakan : ६ घरफोड्या ; २ वर्षे सश्रम कारावास

अघोरी विद्याच्या सहाय्याने गुप्तधन शोधणे,  नरबळी देणे, पैशाचा पाउस पाडणे,  अघोरी उपाय करुन रुग्णांवर उपचार करणे किंवा भाणामती करणे असे अंधश्रद्धेचे प्रकार आपण नेहमी ऐकतो वाचतो.  खेड तालुक्यात रेटवडी येथे असाच एक धक्कादायक  प्रकार समोर आला.

सोमवारी ( दि १७ जुलै  ) रोजी आमवस्या असल्यामुळे गावच्या स्मशानभूमीत बोकडाचे मुंडके, पाय काळ्या रंगाच्या बाहुल्या, लिंबू, सुई, हळद-कुंकू आढळून आले. आज सकाळी ग्रामस्थांना हा प्रकार समजला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.  असे प्रकार करणाऱ्या मंडळींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.