Khed: आईच्या जमिनीचा हिस्सा दे म्हणत शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – आईच्या जमिनीचा हिस्सा कधी देणार म्हणत( Khed)शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे.ही घटना शुक्रवारी (दि.23) वाकी, खुर्द,  खेड येथे घडली आहे.
याप्रकरणी अशोक किसन कड (वय 45, रा, खेड) चाकण पोलीस ठाण्यात (Khed)फिर्याद दिली  आहे. यावरून रविंद्र भिमाजी खांडेभराड ( रा.खेड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरून जात असताना आरोपीला अडवून  आईच्या नावाचा हिस्सा कधी देतो म्हणत चिडून शिव्या घालून , कारमधून लोखंडी रॉड काढून फिर्यादीच्या हातावर पाठीवर  व पायावर मारून जखमी केले यावरून चाकण पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.