Pimple Guruv: सोडा शॉप च्या कामगाराला किरकोळ कारणावरून डोक्यात काचेची बाटली मारून मारहाण

एमपीसी न्यूज –   सीसी टिव्ही फूटेज दाखव म्हणत सोडा शॉप वरील कामगारास दोघांनी (Pimple Guruv)सोडा बॉटल मारून जखमी केले हे घटना बुधवारी (दि.21) रात्री पिंपळे गुरव येथील सोडा लँड सोडा शॉप येथे घडली.
याप्रकरणी शालोम सुनील मस्के (वय 20 रा पिंपळे गुरव)  यांनी सांगवी पोलीस (Pimple Guruv)ठाण्यात शुक्रवारी  (दि.23) फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी रोहन उर्फ बंटी फ्रान्सिस अमुलिक व रोहित उर्फ बिबट्या फ्रान्सिस अमुलिक दोघे राहणार पिंपळे गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सोडा शॉप मध्ये काम करत असताना आरोपी तिथे आले व त्यांनी फिर्यादीला सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यास सांगितले. यावेळी फिर्यादी यांनी मालक आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज दाखवतो असे सांगितले.

Pune: पुण्यापासून मुंबईपर्यंत 200 हून अधिक सायकलस्वारांसह राइड टू एमपॉवरची सुरुवात

मात्र आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत केली. तसेच सोडा शॉप मधील काचेची सोड्याची बॉटल फिर्यादीच्या त्यांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच पोलीस तक्रार दिली तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. यावरून फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली, असून सांगवी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.