Akurdi: करणी केल्याची भीती घालत तोतया ज्योतिषाने घातला गंडा

एमपीसी न्यूज – करणी केल्याची भीती घालत तोतया ज्योतिषाने (Akurdi)एका व्यक्तीची 15 हजारांची फसवणूक केली. तसेच त्या व्यक्तीची 20 हजारांची सोन्याची अंगठी हात चलाखीने पळवून नेली. ही घटना 9 जानेवारी रोजी सकाळी दत्तवाडी आकुर्डी येथे घडली.
सिद्धार्थ यशवंत सपकाळे (वय 34, रा. दत्तवाडी आकुर्डी) यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने (Akurdi)तो ज्योतिष जाणतो असे फिर्यादीस सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच फिर्यादीवर एका महिलेने करणी केली असल्याचे सांगत पूजेसाठी 15 हजार रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादीने आरोपीकडे विश्वासाने सोपवलेली 20 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी हात चलाखीने पूजेच्या सामानात न बांधता घेऊन गेला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.