Chakan : चाकणच्या चक्रेश्वर मंदिरात 2 लाख भाविकांची हजेरी

एमपीसी न्यूज : महाशिवरात्री निमित्त चाकण (ता. खेड) येथील चक्रेश्वर मंदिरात (Chakan) शुक्रवारी (दि. ८ मार्च) सकाळपासूनच पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. चक्रेश्वर मंदिर परिसरात आणि गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. रात्री उशिरा पर्यंत सुमारे २ लाख भाविकांनी येथे दर्शन घेतले. महाशिवरात्रीनिमित्त चाकण शहरातील आणि परिसरातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची शिवदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती . दरम्यान लाखो भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर चाकण वाहतूक पोलिसांच्या वतीने येथे कोंडी होऊ नये यासाठी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. चाकण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

चाकणच्या चक्रेश्वर मंदिरात ‘महाशिवरात्र’ भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. देवस्थानच्या वतीने महापूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले कण्यात आले. चक्रेश्वर मंदिरातील शिवलिंगाची आकर्षक फुलांनी सजावट केली होती. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त देवस्थानच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.

Sangvi : डिव्हायडरला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

मध्यरात्रीपासून सुरू झालेले धार्मिक विधी, पहाटेपासून दर्शनासाठी लागलेली भाविकांची रांग, अशा भक्तिमय वातावरणात चाकणच्या या मंदिरामध्ये महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली. अभिषेक, होमहवन, महाप्रसाद आदी (Chakan) धार्मिक कार्यक्रमांचे मंदिरात आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आमदार ॲड. राम कांडगे यांनी दिली.

भाविकांसाठी अमरनाथ सेवा मंडळाच्या माध्यमातून रामदास धनवटे व त्यांचे सहकारी यांच्यावतीने, त्याच प्रमाणे नागेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर, बोल्हाई माता मंदिर याठिकाणी दर्शनसाठी आलेल्या सर्वच भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. चाकण चक्रेश्वर मंदिर येथे यंदाच्या भाविकांच्या तोबा गर्दीने मंदिराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. चाकण मधील मंदिरात झालेल्या प्रचंड गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त होता. चाकण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांची मदत घेण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.