Sangvi : डिव्हायडरला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – डिव्हायडरला धडकल्याने (Sangvi) दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 3 जानेवारी रोजी सांगवी अंडरपास येथे घडला आहे.

रामहरी संतराम काळुके (वय 49 रा. चिंचवडेनगर) यांनी सांगवी पोलिसांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई किरण विश्वनाथ खडक उमरगे यांनी फिर्याद दिली आहे.

Bhosari : रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामहरी काळुके यांनी त्याच्या ताब्यातील (Sangvi) दुचाकी भरधाव वेगाने चालवत असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वेगात रस्ता दुभाजकाला धडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात रामहरी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.