Nigdi : रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ, एकाला अटक

एमपीसी न्यूज – योग्य उपचार करत नाही (Nigdi) म्हणत नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. हा सारा प्रकार गुरुवारी (दि.7) स्टर्लिंग हॉस्पिटलच्या समोरच्या लॉबीमध्ये घडला आहे.

याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली आहे. यावरून संदिप उत्तम जाधव (वय 38 रा.पिंपळे गुरव पुणे) याला अटक केली आहे. तसेच एका महिलेवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Sangvi : डिव्हायडरला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या आई या हॉस्पिटलमध्ये  दाखल आहेत. त्यांच्यावर योग्य उपचार होत नाहीत, त्यांच्या जवळ थांबू दिले जात नाही म्हणून आरोपींनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की (Nigdi) करत शिवीगाळ केली व आरडाओरड करून जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून निगडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.