Chakan : ६ घरफोड्या ; २ वर्षे सश्रम कारावास

खेड न्यायालयाचा निकाल

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील आळंदी पोलीस ठाण्यात ५ व चाकण (Chakan) पोलीस ठाण्यात एक असे सहा घरफोडीचे गुन्हे असलेल्या सराईत चोरट्याला राजगुरूनगर (खेड )  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

BJP : शंकर जगताप यांच्या शहराध्यक्षपदी नियुक्तीला विरोध

सचिन उर्फ लंगड्या गोरक्षनाथ काळे वय ५२ वर्ष रा. देहूरोड असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आळंदी पोलीस स्टेशन हद्दीत सन २०१८,२०१९, २०२२ या वर्षात तब्बल ५ वेळा व चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकदा असे ६ वेळा घरफोडी करून दागिने व ऐवजाची चोरी केला होता.

सचिन उर्फ लंगड्या गोरक्षनाथ काळे याने आळंदी येथे ५ तर चाकण (Chakan) येथे एक अशा ६ वेळा घरफोड्या केल्या होत्या. या प्रकरणी सचिन उर्फ लंगड्या गोरक्षनाथ काळे चाकणची घरफोडी झाल्यानंतर पोलिसांनी अटक केली होती. या सर्व चोऱ्या केल्याचे त्याने कबुल केले होते.  त्यानंतर तो येरवडा जेलमध्ये होता. आता या खटल्याचा निकाल लागला असून न्यायालयाने २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.