Khed : खेड तालुक्यातील कळमोडी धरण भरले 100 टक्के

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील (Khed) दीड टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेले कळमोडी धरण काल रात्री 100  टक्के भरले. या धरणातून सुमारे 500 पेक्षा जास्त क्यूसेस वेगाने आरळा नदीत पाणी सांडव्यावरून सुरु झाले आहे. यामुळे त्याखाली असलेल्या चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

खेड तालुक्यात कळमोडी, चासकमान, भामा आसखेड ही तीन धरणे आहेत. पैकी कळमोडी धरण दि. 18 जुलै रोजी पहाटे 100 टक्के भरले.  पुणे जिल्ह्यातील 100 टक्के भरणारे हे पहिले धरण आहे. मागील वर्षी कळमोडी धरण 11 जुलै 2022 रोजी 100  टक्के भरले होते.

BJP : शंकर जगताप यांच्या शहराध्यक्षपदी नियुक्तीला विरोध

तर, मागील दोन वर्षांपूर्वी धरण 12 ऑगस्ट 2021 रोजी शंभर टक्के भरले होते. मागील वर्षीच्या तुलनेत आठ दिवस उशिरा धरण भरले आहे. कळमोडी धरणात सन 2010 पासून पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यास सुरूवात झाली. पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणास कोणत्याही प्रकारचे दरवाजे नाहीत.

धरण भरल्यानंतर धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहते. कळमोडी धरण परिसरात गेली आठ दिवस पाऊस पडत असल्याने धरण भरले. कळमोडी धरणाच्या खाली असलेल्या चासकमान (Khed) धरणाच्या पाणीसाठ्यात आता वेगाने वाढ होणार आहे. चासकमान धरणात 26.37 टक्के पाणीसाठा होऊन 164 मिलिमीटर एकूण पावसाची नोंद झाली आहे.

धरण साखळीत सुरु असलेल्या पावसाने चासकमान आणि भामा आसखेड धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.