BJP : शंकर जगताप यांच्या शहराध्यक्षपदी नियुक्तीला विरोध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड भाजपचे  (BJP) नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नियुक्तीला पक्षाचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी विरोध केला आहे. जगताप कुटुंबाला झुकते माप दिल्याचा त्यांचा आक्षेप आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शंकर जगताप यांची पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पण, या नियुक्तीला पक्षातून विरोध समोर आला. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने पोटनिवडणुकीत संधी दिली. त्यावेळी पक्ष आणि शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या सोबत राहिल्याने अश्विनी जगताप आमदार झाल्या.

Alandi : दारूभट्टीवर आळंदी पोलिसांचा छापा

असे असतानाच जगताप कुटुंबातील शंकर जगताप यांना भाजपने प्रदेश पातळीवर संधी दिली. भाजप संघटनेत अवघे वर्ष झाले नसताना आता शहराध्यक्षपदी त्यांची निवड केली. या निवडीमुळे पक्षाच्या धोरणांबाबत चर्चा सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय पक्षांमधील कुटुंब वादाला नेहमीच विरोध केला आहे.

‘पार्टी विथ डिफरन्स’ असे म्हणत भाजपने देखील एकाच कुटुंबात अनेक पदे किंवा एकाच कुटुंबातील व्यक्तींना वारंवार संधी देण्याचे टाळले आहे. असे असताना जगताप कुटुंबातील व्यक्तींना सतत झुकते माप दिले जाते असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.