Cantonment Board Election : अखेर सात वर्षांनी पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांची निवडणूक जाहीर

एमपीसी न्यूज : सात वर्षांच्या कालावधीनंतर पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट (Cantonment Board Election) बोर्डांची 30 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार यामध्ये 57 कॅन्टोन्मेंट बोर्डांचा सहभाग असणार आहे. मात्र, देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा या अधिकृत अधिसूचनेमध्ये समावेश नाही.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील एकूण आठ वॉर्डांपैकी महिलांसाठी, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात 2, 5 आणि 6 वॉर्ड राखीव आहेत.  वॉर्ड क्रमांक 4 पीसीबीमध्ये अनुसूचित जाती उमेदवारासाठी राखीव आहे, तर 1 साठी KCB मध्ये SC/ST साठी राखीव ठेवण्यात आले आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका या जानेवारी 2015 मध्ये झाल्या होत्या. त्यांचा पाच वर्षांचा कालावधी हा फेब्रुवारी 2020 मध्ये संपला होता. कॅन्टोन्मेंट कायदा, 2006 नुसार सहा महिन्यांची दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मतदार यादी अंतिम झाली असून आठ प्रभागांमध्ये एकूण 38,327 मतदार आहेत. पुणे-मुंबई महामार्गाच्या बाजूला असलेले, देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हे अगदी नवीन आहे. सुमारे पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या या मंडळाचे सात प्रभाग आहेत.

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भागात (Cantonment Board Election) हे सातही प्रभाग गेल्या निवडणुकीत भाजपने जिंकले होते. त्यामुळे यंदा काय निकाल लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Today’s Horoscope 21 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.