Today’s Horoscope 21 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 21 February 2023
वार – मंगळवार.
21.02.2023
शुभाशुभ विचार- क्षयदीन.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – शततारका 9.00 पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा.
चंद्र राशी – कुंभ.
—————————————-
मेष  (शुभ रंग – आकाशी)
आज जसे चिंताल तसे होईल. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमची काही अपुरी स्वप्न साकार होतील. व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. छान दिवस आहे

वृषभ (शुभ रंग- राखाडी )
उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे तुम्हाला सहकार्य राहील. अधिकार योग चालून येतील. हाताखालचे लोक तुमच्याशी नम्रतेने वागतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व कराल.

मिथुन ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत अवश्य विचारा. वाहतुकीचे नियम अजिबात मोडू नका दंड चुकणार नाही.

कर्क (शुभ रंग- हिरवा)
नवीन ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. आज विश्वसनीय मित्रही दगा देतील. कार्यक्षेत्रातही सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. गाडी चालवताना सावधानता बाळगा.

सिंह (शुभ रंग- निळा)
व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल. वादविवादात आपलीच मते इतरांवर लादता येतील. वैवाहिक जीवनात आज गोडी गुलाबी असेल.

कन्या ( शुभ रंग- मरून)
काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ मंडळींना काही आरोग्यविषयक तपासण्या करून घ्याव्या लागतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत हमखास यश मिळेल.

तूळ ( शुभ रंग- केशरी)
आज उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण राहील स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल आज गृहिणी पार्लर साठी आवर्जून वेळ काढतील. संध्याकाळी सहकुटुंब चैन कराल.

वृश्चिक (शुभ रंग- मोरपंखी)
धंद्यातली अडकलेली येणी वसूल होतील. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व तुम्ही सिद्ध करू शकाल. विरोधकांशी ही गोड बोलून तुम्ही आपला स्वार्थ साधून घ्याल. आज काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे घरी पायधुळ झाडातील.

धनु (शुभ रंग)
आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. घाई गर्दीत काही चुकीचे निर्णय तुम्ही घ्याल. आज प्रवासात काही नवे हितसंबंध जुळून येतील. शेजाऱ्यांशी ही आज सलोखा वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यास कंटाळवाणा वाटेल.

मकर ( शुभ रंग- पांढरा )
आज आवक मना जोगती असली तरीही बचतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. कठोर बोलण्याने नाती दुरावतील. क्षुल्लक कारणावरून आज शेजाऱ्यांशी मतभेदाची शक्यता आहे. शब्द जपून वापरा.

कुंभ (शुभ रंग – जांभळा)
आज तुमची तब्येत काहीशी नरमच असेल मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. जशास तसे या धोरणाने वागा क्षूल्लक गोष्टी फार मनाला लावून न घेता सोडून द्या.

मीन (शुभ रंग – मोतिया) Today’s Horoscope 21 February 2023
आज तुम्हाला काही अत्यावश्यक देणी चुकवावी लागतील. दूरच्या प्रवासात आपले मौल्यवान ऐवज सांभाळा. कठोर बोलण्याने नाती दुरावतील. आज क्षणिक मोहात अडकू नका.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Chinchwad Bye-Election : बंडखोर उमेदवार भाजपचाच – जयंत पाटील

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.