Central Railway : मध्य रेल्वेची यशस्वी 72 वर्ष पूर्ण

एमपीसी न्यूज – निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य यांचे (Central Railway)एकत्रीकरण करून 5 नोव्हेंबर 1951 रोजी मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे हे पाच विभाग असलेल्या मध्य रेल्वेचे जाळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये चार हजार 219 किलोमीटर अंतरावर पसरलेले आहे. मध्य रेल्वेच्या स्थापना दिवसानिमित्त जाणून घेऊया मध्य रेल्वेचा रंजक इतिहास.

ग्रेट इंडिया पेनिन्सुला (जीआयपी) रेल्वेचा उत्तराधिकारी असलेली(Central Railway) मध्य रेल्वे आपल्या स्थापनेची 72 गौरवशाली वर्षे पूर्ण करत आहे. आशियातील आणि भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. जसजशी वर्षे उलटली, तसतशी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचा विस्तार होत गेला. सन 1900 मध्ये ग्रेट इंडिया पेनिन्सुला रेल्वे कंपनीमध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीचे विलीनीकरण झाले.

Maharashtra : राष्टवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका

त्यानंतर तिची सीमा उत्तरेला दिल्ली, ईशान्येला कानपूर व अलाहाबाद आणि पूर्वेला नागपूरपासून दक्षिण-पूर्वेला रायचूरपर्यंत वाढवण्यात आली. अशा पद्धतीने बॉम्बे येथून भारताच्या जवळपास सर्व भागांशी संपर्क साधला जाऊ लागला. ग्रेट इंडिया पेनिन्सुलाचे रेल्वेमार्ग 1600 मायलेज म्हणजेच दोन हजार 575 किलोमीटर एवढे होते.

5 नोव्हेंबर 1951 रोजी निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मध्य रेल्वेवर मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे असे पाच विभाग आहेत. मध्य रेल्वेचे नेटवर्क महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये चार 219 किलोमीटरवर पसरलेले आहे. मध्य रेल्वे अंतर्गत एकूण 471 स्थानके आहेत.

मध्य रेल्वेने आजवरच्या प्रवासात अनेक कामगिरी भारतात सर्वप्रथम केली आहे. त्यापैकी काही उल्लेखनीय कामगिरी म्हणजे पहिली शताब्दी एक्सप्रेस, पहिली जन शताब्दी एक्सप्रेस, पहिली तेजस एक्सप्रेस मध्य रेल्वेने सुरु केली आहे. मध्य रेल्वे सातत्याने विकासाच्या आघाडीवर आहे. निर्मितीच्या वेळी मध्य रेल्वेचे मूळ लोडिंग 16.58 दशलक्ष टन होते. ते आता 2022-23 मध्ये 81.88 दशलक्ष टन झाले आहे. सन 2023-24 मध्ये, मध्य रेल्वेने 49.02 दशलक्ष टन एवढे मालवाहतुकीचे लक्ष्य गाठले आहे.

उपनगरीय सेवा (लोकल) देण्यात देखील मध्य रेल्वेने चांगली कामगिरी केली आहे. स्थापनेच्या वेळी मध्य रेल्वे 519 उपनगरीय फेऱ्या चालवत होती. आता मुंबईमध्ये 1810 आणि पुणे येथे 40 उपनगरीय फेऱ्या सुरु आहेत.

मुंबईची उपनगरीय सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी ठरली आहे. मध्य रेल्वेने उपनगरीय नेटवर्कमध्ये सातत्याने वाढ केली असून सध्या चार कॉरिडॉर आहेत. तीन डब्यांपासून सुरू झालेल्या उपनगरीय सेवा हळूहळू 9 डब्यांच्या, 12 डब्यांच्या आणि 15 डब्यांच्या काही सेवांपर्यंत वाढल्या आहेत. प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी करण्यासाठी वातानुकूलित उपनगरीय सेवाही सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय नवीन रेल्वे लाईन निर्माण करणे, दुहेरीकरण, तिसरी व चौथी लाईन, विद्युतीकरण, पूल बांधणे, नवीन स्थानके बांधणे आदी पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत.

मध्य रेल्वेने मान्सूनपूर्व मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. त्यामुळे मुसळधार पाऊस असूनही उपनगरीय गाड्या धावत होत्या. मध्य रेल्वेने या वर्षात आतापर्यंत विक्रमी 147.77 किमीचे मल्टी ट्रॅकिंग पूर्ण केले आहे. वर्ष 2019 मध्ये अभूतपूर्व पाऊस आणि नेरळ-माथेरान सेक्शनवर झालेल्या नुकसानीनंतर, मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी 22 ऑक्टोबर 2022 पासून पुन्हा सुरू झालेले विभाग आणि सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम केले आहे. तर अशा मध्य रेल्वेचे 73 व्या वर्षात आजपासून पदार्पण झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.