Chakan :  कंपनीची 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – कंपनीच्या व्यवहारात 10 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी कंपनीच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार(Chakan) चाकण येथील शाडोफॅक्स टेक्नोलॉजीस्ट प्रा.लि. या कंपनीत येथे 1 एप्रिल 2022 ते 19 ऑक्टोबर 2022 या कालावधीत झाली आहे.

याप्रकरणी विवेक अनिल गोरटमारे (वय 29 रा. चाकण) यांनी मंगळवारी (दि.20) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सागर लहू ढेरे (वय 32 रा.खेड) याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Charholi : चऱ्होलीचे पाणी वळविले कुठे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा शाडोफॅक्स टेक्नोलॉजीस्ट प्रा.लि. या कंपनीतील चाकणच्या शाखेत  काम करत होता. त्याने सहा महिन्यात कंपनीच्या व्यवहरात 10 लाख 6 हजार 796 रुपयांचा गैरव्यवहार केला. कंपनीची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आरोपी विरोधात चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास (Chakan) करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.