Chakan : तोतया ग्राहकांनी ज्वेलर्स दुकानातून दागिने पळविले

एमपीसी न्यूज – दागिने खरेदीच्या बहाण्याने दुकानात आलेल्या दोन महिलांनी हात चलाखीने 31 हजारांचे दागिने फसवणूक करून (Chakan) नेले. ही घटना शनिवारी (दि. 8) सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या कालावधीत महात्मा फुले चौक चाकण येथील परदेशी ज्वेलर्स या दुकानात घडली.

रुपेश मधुकर परदेशी (वय 29, रा. परदेशी वस्ती, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakan : टोमॅटोच्या भावाने सामान्य नागरिक लालबुंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चाकण मधील महात्मा फुले चौकात परदेशी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दोन अनोळखी महिला दागिने खरेदीच्या बहाण्याने आल्या. त्यांनी 31 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातचलाखीने फसवणूक करून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत (Chakan) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.