Chakan : टोमॅटोच्या भावाने सामान्य नागरिक लालबुंद

किरकोळ बाजारात किंमतींचा कहर

एमपीसी न्यूज -खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये (Chakan) टोमॅटोच्या आवकेत घट झाली असून भावात वाढ झाली आहे. चाकण मधील घाऊक बाजारात टोमॅटोला 60 ते 80 रुपये दर मिळत असून , चाकणच्या किरकोळ बाजारात टोमॅटोला 100 ते 120 रुपये एवढा प्रतीकिलोस दर मिळत आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावाने सामान्य नागरिक लालबुंद होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

चाकण मार्केट मध्ये टोमॅटोच्या भावाने कहर केला आहे. राज्यातील मोठ्या मार्केट कमिट्यांमध्ये टोमॅटोने कहर केल्याचे व राज्यात अनेक ठिकाणी टोमॅटो 150 ते 200 रुपये किलोदराने विक्री होत असल्याचे चाकण मार्केट मधील तरकारी अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष कुमार गोरे व अडते आणि व्यापाऱ्यांनी सांगितले.  टोमॅटोचे भाव अचानक गगनाला भिडल्याने ग्राहकांपुढे एवढ्या जास्त दरात टोमॅटो खरेदी कसा करावा असा प्रश्न पडला आहे.

Pimpri : विश्व हिंदू परिषदेच्या वतीने परतीच्या वारीमध्ये आरोग्यसेवा

काही महिन्यांपूर्वी  टोमॅटोचा दर अवघा 1 ते 2 रुपये किलो होता. त्यामुळे अनेक टोमॅटो उत्पादकांनी स्वतःच टोमॅटोची पिके भुईसपाट केली.  त्यामुळे बाजारातील आवक कमी झाली व पावसाळ्याच्या तोंडावरच किंमतींनी जोर पकडला आहे . भाव एकदम गगनाला भिडले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.  चाकण मार्केटमध्ये मागील पंधरावड्यापासून टोमॅटोच्या दरात मोठी चढ उतार सुरु आहे. सुरुवातीला 60 ते 80 रुपये किलो दराने टोमॅटो विक्री झाले.

आता तर चाकण मध्ये किरकोळ बाजारात चांगल्या टोमॅटोचा दर 100 ते 120 रुपये प्रति किलोवर पोहचला. त्यामुळे दोन तीन किलो टोमॅटो घेऊन जाणारा ग्राहक आता एक पाव टोमॅटो खरेदी करत असल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. सध्या बाजारात एरव्ही प्रमाणे चांगल्या प्रतीच्या टोमॅटोची आवक कमी असून  निकृष्ट प्रतीचा टोमॅटो अधिक येत (Chakan) असल्याचे ग्राहक आणि व्यापारी सांगत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.