Talegaon : पोलिसांनी थांबवल्याची बतावणी करून महिलेचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – आम्हाला इथे पोलिसांनी थांबवले आहे, अशी बतावणी करून दोघांनी एका महिलेचे (Talegaon) 69 हजारांचे दागिने काढून घेतले. ही घटना सोमवारी (दि. 8) सकाळी पावणे दहा वाजता तळेगाव-चाकण रोडवर घडली.

याप्रकरणी 62 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात (Talegaon) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wakad : महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्यास अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तळेगाव-चाकण रस्त्याने चालत जात होत्या. दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. आम्हाला इथे पोलीस साहेबांनी उभे केले आहे. तुम्हाला पुढे धोका आहे, असे सांगून दागिने कागदात बांधून ठेवण्याचा बहाणा केला. हातचलाखी करून महिलेचे 69 हजारांचे दागिने दोघांनी पळवून नेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.