Wakad : कौटुंबिक वादातून पत्नीला दारूच्या बाटलीने मारहाण

पिंपरी -चिंचवड मध्ये महिलांवरील अत्याचार आणि मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ

एमपीसी न्यूज – कौटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणात पतीने दारूची बाटली फोडून पत्नीला मारहाण केली आहे, ज्यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी (दि. 8) दुपारी बारा वाजताच्या सुमारास काळेवाडी येथे घडली आहे.

अजय मधुकर दाणे (वय 26, रा. आदर्श नगर, काळेवाडी) असे गुन्हा  (Wakad) दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत त्याच्या 25 वर्षीय पत्नीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talegaon : पोलिसांनी थांबवल्याची बतावणी करून महिलेचे दागिने लंपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे पती-पत्नी असून त्यांच्यात कौटुंबिक भांडण झाले. त्यावेळी आरोपीने शिवीगाळ करीत लाकडी बेलण्याने डोक्यात मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या उजव्या पायाच्या मांडीवर, दोन्ही दंडांवर चावा घेऊन जखमी केले. रूममध्येच असलेली रिकामी बिअरची बाटली फोडून फिर्यादीच्या तोंडावर, गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.