Hinjawadi :घरातील कपाटातून अडीच लाखांच्या दागिने चोरीला

मागच्या काही दिवसांमध्ये हिंजेवाडी परिसरात चोरीच्या घटनेत वाढ

एमपीसी न्यूज – घराच्या उघड्या दरवाज्या वाटे घरातील कपाटामधून चोराने सुमारे अडीच लाखांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना गोदरेज एलिमेंट्स सहकारी संस्था, हिंजवडी – माण रोड येथे  3 ते 6 एप्रिल दरम्यान  घडली.

याबाबत 31 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात (Hinjawadi) गुन्हा दाखल केला आहे.

Wakad : कौटुंबिक वादातून पत्नीला दारूच्या बाटलीने मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने फिर्यादी (Hinjawadi) यांच्या उघड्या कपाटातील ड्रॉवरमधील डब्यातून दोन लाख 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. घटनेची माहिती मिळताच फिर्यादी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.