Dapodi : भर रस्त्यात महिलेचा विनयभंग ; दोघांना अटक

एमपीसी न्यूज –  रात्रीच्या वेळी मैत्रिणीसोबत (Dapodi) शतपावली करत असलेल्या महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 9) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास दापोडी येथे घडली.

सागर शिवाजी माने (वय 32, रा. गणेश नगर, दापोडी), शुभम अतुल हिरे (वय 26, रा. नवी सांगवी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chakan : तोतया ग्राहकांनी ज्वेलर्स दुकानातून दागिने पळविले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या मैत्रिणी सोबत शतपावली करीत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फिर्यादी यांना त्यांचा मोबाईल नंबर मागितला. तसेच फिर्यादीस नाव विचारत त्रास देऊ लागले. फिर्यादी यांनी आरोपींशी बोलणे टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी फिर्यादी सोबत गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत (Dapodi) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.