Chakan : केवळ संशयातून अंगावर कार घालून केले जखमी, कार चालकास अटक

एमपीसी न्यूज – बायकोशी प्रेम संबंध असल्याच्या संशयातून पतीने एकाला कारने ( Chakan) धडक देत जखमी केले आहे. ही घटना गुरुवारी (दि.23) चाकण येथे घडली. चाकण पोलिसांनी संबंधीत कार चालकाला अटक केली आहे.

महेश जोपा नाणेकर (वय 34 रा.चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Chinchwad : ‘दिलासा’तर्फे गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांना दिवाळी साहित्य अन् फराळ वाटप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे ओळखीचे आहेत. आरोपीला फिर्यादी व त्याच्या पत्नीमध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय होता.

यातून त्याने फिर्यादी हे दुचाकी वरून जात असताना त्यांच्या अंगावर कार घालून फिर्यादीला जखमी केले व दुचाकीचे नुकसान केले. यावरून चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत (Chakan) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.