Chinchwad : वल्लभनगर आगाराची 80 लाखांची दिवाळी

एमपीसी न्यूज – यावर्षीची दिवाळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) सकारात्मक गेली आहे. (Chinchwad) दिवाळीमध्ये सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामामुळे एसटीला चांगले उत्पन्न मिळाले आहे. पुणे विभागातील वल्लभनगर आगारातून देखील दिवाळी निमित्त ज्यादा बसेसचे नियोजन करण्यात आले होते. वल्लभनगर आगाराला दिवाळीच्या दहा दिवसात सुमारे 80 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात लाखोंच्या संख्येने विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक वास्तव्यास आहेत. दिवाळीला गावी जाण्यासाठी प्रत्येकाकडे आपापले वाहन उपलब्ध नसते. त्यामुळे कामगार वर्ग एसटीला पसंती देतो. वल्लभनगर आगार हे पिंपरी-चिंचवड शहरातील एकमेव आगार आहे. आगारातून राज्याच्या विविध भागात एसटी बसेस सोडल्या जातात.

शहरातून राज्याच्या विविध भागात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी नियमित फे-यांसह ज्यादा बस सोडण्यात आल्या. दिवाळीच्या कालावधीत दररोज सुमारे 45 ज्यादा बस विविध मार्गांवर सोडल्या जात होत्या. या सर्व बसेसला प्रवाशांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. वल्लभनगर आगाराने 9 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत 79 लाख 51 हजार 100 रुपये एवढे उत्पन्न मिळवले.

Chakan : केवळ संशयातून अंगावर कार घालून केले जखमी, कार चालकास अटक

शासनाने खासगी बसवर तिकीट दरवाढ करण्याबाबत निर्बंध घातले आहेत. प्रवाशांची लुट थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात (Chinchwad) आला आहे. तर दुसरीकडे एसटीने प्रवाशांना विविध सवलती दिल्या आहेत. त्यामुळे देखील एसटीच्या प्रवासी संख्या वाढण्यावर सकारात्मक परिणाम झाला आहे. महिला आणि 65 वर्षांवरील पुरुषांना एसटीच्या तिकीट दरामध्ये 50 टक्के सवलत आहे. तर 75 वर्षांवरील सर्वांना 100 टक्के सवलत आहे. त्याचाही प्रवाशांना आणि प्रसंगी एसटीला फायदा होत आहे.

राज्य परिवहन महामंडळाला 20 दिवसात 510 कोटींचे उत्पन्न

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (MSRTC) दिवाळीच्या कालावधीत चांगलाच धनलाभ झाला आहे. एक ते 20 नोव्हेंबर या कालावधीत एसटीने तब्बल 510 कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये 20 नोव्हेंबर रोजीच्या उत्पन्नाने एसटीचे आजवरचे सर्व रेकॉर्ड तोडत एकाच दिवसात 37 कोटी 63 लाख रुपयांची कमाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.