Chakan Rape Case : फेसबुकच्या ओळखीने केला घात; लग्नाच्या आमिषाने बलात्कार

एमपीसी न्यूज – फेसबुकवरून (Chakan Rape Case) ओळख झालेल्या महिलेला ‘मला तू खूप आवडतेस, मी तुझ्या बरोबर लग्न करणार आहे, मी तुला खूप खुश ठेवेन असे सांगत लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केला. येलवाडी, लोणावळा, पुणे येथे नेऊन वेळोवेळी बलात्कार केला आणि खालच्या जातीची असल्याचे सांगत लग्नास नकार दिला. हा प्रकार सप्टेंबर 2020 ते नोव्हेंबर 2021 दरम्यान घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी (दि.1) चाकण म्हाळुंगे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण दत्तात्रय गोरे (रा. रुई छत्तीसे, पट्टा वस्ती, नगर सोलापूर रोड, अहमदनगर) याच्या विरोधात कलम 376 (2), (एन), सह ॲट्रोसिटी ॲक्ट 3 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vadgaon Maval – शंकरराव म्हाळस्कर यांचे निधन

आरोपी आणि फिर्यादी यांची फेसबुकच्या माध्यमातून (Chakan Rape Case) Chakan Rape Case ओळख झाली. त्यांचे फोनवर बोलणे सुरू झाले. आरोपी किरण याने महिलेला म्हाळुंगे येथे बोलावून घेतले. महिलेला दुचाकीवरून एका हॉटेलमध्ये नेले. गप्पा मारताना आरोपी किरण याने ‘मला तू खूप आवडतेस, मी तुज्यातुझ्याबरोबर लग्न करणार आहे, मी तुला खूप खुश ठेवेन’ असे म्हणत फिर्यादीबरोबर शरीरसंबंध करण्याची मागणी. त्यास फिर्यादीने नकार दिला. परंतु, आरोपी किरण याने मी आत्ता ड्युटीवर जाणार आहे आणि मी तुझ्याबरोबरच लग्न करणार आहे असे आमिष दाखवून फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्थापित केले.

त्यानंतर लोणावळा, पुणे येथील हॉटेलवर नेऊन लग्नाच्या आमिषाने बलात्कार केला. फिर्यादीने लग्नाबाबत विचारपूस करताच तू खालच्या जातीची, समाजाची आहेस. मी तुझ्याबरोबर लग्न करणार नाही असे म्हणून लग्न करण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.