Chakan Crime : अल्पवयीन मुलीला धमकी देत अत्याचार करणाऱ्या नराधमावर गुन्हा

एमपीसी न्यूज – मागील सहा महिन्यांपासून जिवे मारण्याची धमकी देत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर अखेर चाकण पोलीस (Chakan Crime) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार खेड तालुक्यातील एका गावात मार्च ते 12 सप्टेंबर या कालावधीमध्ये घडला. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने सर्व प्रकार उघडकीस आला.

चिमा भिका वाघमारे (वय 35, रा. अनावळे, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Motor World : पुण्याच्या अवलियाची 225 छोट्या मोटार मॉडेलची निराळी दुनिया

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 14 वर्षीय मुलगी घरात एकटी असताना आरोपीने तिच्या घरात जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलीला फोन करून वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून धमकावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. यामध्ये पीडित मुलगी पाच महिन्यांची गरोदर राहिली. त्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस (Chakan Crime) तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.