Chakan : शिवसेना ठाकरे गटाकडून किरीट सोमय्यांचा निषेध

एमपीसी न्यूज –  भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या संदर्भातील वादग्रस्त ध्वनी चित्रफितीमुळे राजकीय वर्तुळात (Chakan) खळबळ उडाली असून शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे सोमय्यांविरोधात चाकण ( ता. खेड ) येथे ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

 

Chakan : खेडमधील दरडप्रवण व पूरप्रवण स्थितीचा आढावा तयारीसाठी मॉक ड्रिल ; 2 गावे मृत्युच्या दाढेत

भर पावसात एकत्रित आलेल्या संतप्त कार्यकर्त्यांनी चाकण येथील माणिक चौकात सोमय्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली.

सोमय्या याचं करायचं काय, खाली डोक वर पाय, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे,  अशोक खांडेभराड, लक्ष्मण जाधव, युवा सेना शहर प्रमुख ऋषिकेश वाव्हळ, रामहरी आवटे, अशपाक शेख, कविता करपे, स्वामी कानपिळे, शेखर पिंगळे,किरण शेलार, ज्ञानेश्वर कड,  आदींसह चाकण शहरातील ठाकरे गटाचे आजी – माजी पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने (Chakan) उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.