Chakan : खेडमधील दरडप्रवण व पूरप्रवण स्थितीचा आढावा तयारीसाठी मॉक ड्रिल ; 2 गावे मृत्युच्या दाढेत

एमपीसी न्यूज – खेड तालुक्याच्या पश्चिम भागात दरडप्रवण व पूरप्रवण स्थितीचा अभ्यास करून योग्य त्या (Chakan) उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.  इर्शाळवाडीतील घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील प्रशासन काही प्रमाणात सज्ज झाल्याचे चित्र खेड तालुक्यात पहावयास मिळत आहे. दरड प्रवण गावांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात खेड मधील दोन गावांचा समावेश असल्याची बाब समोर आली आहे.

Sangvi : रस्ता खचल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह अभियंत्यावर गुन्हा दाखल

इर्शाळवाडी प्रमाणे घटना पुण्यातील ग्रामीण भागात घडू नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारे तयारी सुरु करण्यात आली आहे. पुणे जिल्हा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी पूर आणि भूस्खलनाच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी खेड तालुक्यात मॉक ड्रिल आयोजित केले होते. पुणे जिल्हा परिषदेच्या सूचनेनुसार जिल्ह्याच्या इतर भागातही अशा मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात येणार आहे.

आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व सरकारी विभाग त्यांची तयारी तपासण्यासाठी या सरावात सहभागी झाले होते. खेड तालुक्यातील भीमा-भामा नदी संगमावरील शेलपिंपळगाव गावात पूरस्थिती हाताळण्याची तयारी तपासण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आले. आरोग्य विभाग आणि चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्यासह पोलीस अधिकारी यात सहभागी झाले होते.

ती गावे मृत्युच्या दाढेत 

पुणे जिल्ह्यातील संभाव्य दरड प्रवण गावांची यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. त्यात खेड तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे.  खेड तालुक्यातील भोरगिरी येथील पदरवस्ती व भोमाळे गावांचा दरड प्रवण गावांमध्ये समावेश आहे.

त्यातच खेडच्या वनहद्दीत अनेक ठिकाणी पवन चक्क्या उभारल्याने पिढ्यानपिढ्या पोलादी ताकदीचे हे डोंगर सैल झाले आहेत.  पुणे जिल्ह्यातील खेड आणि मावळ या दोन तालुक्यांतील 28 गावांच्या हद्दीतील वनविभागाच्या सुमारे 200 हेक्टर इतक्या राखीव वनक्षेत्रात इनरकॉन कंपनीला पवनऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मान्यता दिली गेली.

या प्रकल्पात संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वत रांगेवर पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम घाटाचा अविभाज्य घटक असलेल्या नाणेघाट आणि परिसरातील डोंगररांगांची या भागात अक्षरशः नासाडी झाली आहे. पवनचक्क्या उभारताना डोंगर माथ्यावर पवनचक्क्यांना लागणारी अवजड यंत्र सामुग्री व विविध वस्तू डोंगरमाथ्यावर नेण्यात आली. बेकायदा प्रचंड उत्खनन केल्याचा परिणाम आता पुढील काळात दिसणार असल्याची भीती व्यक्त होत (Chakan) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.