Sangvi : रस्ता खचल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह अभियंत्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटच्या बाजूचा रस्ता खचल्या (Sangvi) प्रकरणी संबंधीत बांधकाम व्यवसायिक आणि अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. 20) रस्ता खचल्याची घटना पिंपळे सौदागर येथे घडली होती.

Pune : धरण क्षेत्रातील संततधार पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ ; खडकवासला धरण साखळीत 52 टक्के पाणी साठा

घनश्याम सुखवानी, संजय रामचंदानी आणि त्यांच्या कंपनीच्या संबंधित अभियंत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपअभियंता विनायक माने यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्त्यावरील मे. सुखवानी रामचंदानी एलएलपी तर्फे भागीदार घनश्याम सुखवानी आणि संजय रामचंदानी यांना महापालिकेने बांधकाम परवानगी दिली होती.

या दोघांच्या भागिदारीत सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी पाया खोदण्यासाठी मोठा खड्डा करण्यात आला होता. यामुळे या जागेला लागून असलेला रस्ता खचल्याची घटना गुरुवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली

दरम्यान, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले. ‘महापालिका कोणालाही पाठीशी घालणार नाही. ज्यांच्यामुळे ही घटना घडली त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले होते.

त्यानंतर संबंधित विभागातील उपअभियंता माने यांनी सांगवी पोलीस ठाण्यात शुक्रवारी एक तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार नागरिकांच्या जिवितास धोका उत्पन्न करून, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ तपास करीत (Sangvi) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.