Pune : धरण क्षेत्रातील संततधार पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ ; खडकवासला धरण साखळीत 52 टक्के पाणी साठा

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वरसगाव, पानशेत,टेमघर आणि खडकवासला या चारही धरणात मागील आठवड्याभरापासून संततधार (Pune ) पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण साठ्यात झपाट्याने वाढ असून सद्यस्थितीला खडकवासला धरण साखळीत 52 टक्के,तर 15.16 टीएमसी इतका पाणी साठा जमा झाला आहे.

Shirgaon : एखादा व्यक्ती पुरात बुडल्यास कसे वाचवाल; पोलिसांना प्रशिक्षण

राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून पुणे शहर आणि आसपासच्या भागात देखील जोरदार पाऊस सुरू आहे.तर पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वरसगाव,पानशेत,टेमघर आणि खडकवासला या चार ही धरणात मिळून गतवर्षी आजच्या तारखेला 69.19 टक्के,तर 20.17 टीएमसी जमा होता.तर यंदा आजच्या तारखेला 52 टक्के,तर 15.16 टीएमसी इतका पाणी साठा जमा झाला आहे.

 

धरण            आजच पाऊस     टीएमसी   टक्के
खडकवासला     4 मिमी           1.27      64.10
पानशेत             39 मिमी          5.93     55.66
वरसगाव            33 मिमी         6.66      51.94
टेमघर                55 मिमी         1.31      35.32

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.