Shirgaon : एखादा व्यक्ती पुरात बुडल्यास कसे वाचवाल; पोलिसांना प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – सध्या मावळ परिसरात मुसळधार पाऊस सुरू (Shirgaon) आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात नद्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत काय काळजी घ्यावी, याबाबत वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या वतीने शिरगाव पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले.

Pune : पावसाळ्यात आपत्तीच्या परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देण्याची तयारी ठेवा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत धामणे येथे पवना नदीत हे प्रशिक्षण शिबिर पार पडले. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी रुग्णवाहिका, बोट असे साहित्य वापरून पोलिसांना प्रात्यक्षिक करून दाखवले.

एखादा व्यक्ती पुराच्या पाण्यात बुडाल्यास त्याला कसे वाचवता येईल. तसेच पुरात वाहून गेलेला व्यक्ती अंत्यवस्थ झाला असल्यास त्यास प्राथमिक उपचार म्हणून काय खबरदारी घेता येईल, याबाबत सांगण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक आणि काव्या करियर अकॅडमीचे विद्यार्थी देखील उपस्थित होते.

शिरगावच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, संस्थेचे आपत्ती व्यवस्थापन सर्च आणि रेस्क्यू टिमचे अध्यक्ष गणेश निसाळ, उपाध्यक्ष गणेश ढोरे, जीगर सोळंकी, सर्जेस पाटील, सत्यम सावंत, शुभम काकडे, कुनाल दाभाडे, ओमकार भेगडे, सुरज शिंदे, प्रशांत शेडे, गौरव चेपे, कमल परदेशी आदी (Shirgaon) उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.