Shirgaon : वहिनीचा खून करणाऱ्या दिराला लोणीकंद येथून अटक

एमपीसी न्यूज – शिरगाव परंदवाडी येथे वहिनीचा खून करून ( Shirgaon) मटण पार्टी करणाऱ्या दिराला लोणीकंद येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लोणीकंद पोलिसांनी केली आहे.

गणेश रामभाऊ चव्हाण (वय 21 रा.शिरगाव, मावळ) असे अटक आरोपीचे नाव आहे. गणेश हा सराईत आरोपी असून त्याच्यावर चोरीचे अनेक गुहे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची  माहिती मयत वहिनीने पोलिसांना दिली होती. तीन वर्षापुर्वी आरोपीला अटक झाली. त्यानंतर आरोपी हा 15 जानेवारी रोजी तुरुंगातून सुटला. यावेळी गणेश व त्याचा मोठा भाऊ लक्ष्मण यांनी हा राग मनात धरून आपल्चा भावजयीचा डोक्यात दगड घालून खून करत पुरावा नष्ट कऱण्यासाठी  प्रेत त्यांनी चांदखेड य़ेथील डोंगरा लगत जमिनीमध्ये पुरले.

Ashok Chavan : काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर ; आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा

दरम्यान बहिणीचा फोन लागत नसल्याने सुनंदा यांचा भाऊ शाम यांनी सासरी चौकशी केली. त्यांची उडावउडवीची उत्तरे मिळताच त्यांनी पोलीसांकडे बहीण बेपत्ता असल्याची तक्रार दिली. यावरून पोलिसांनी तपास केला असता घरच्यांनीच सुनंदा यांचा खून केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण व आणखी एका महिला आरोपीला अटक केली. मात्र या साऱ्यात गणेश मात्र फरार झाला होता.

लोणीकंद पोलिसांना याची खबर मिळताच पोलिसांनी लोणीकंद परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ सापळा लावून त्याला पकडले. पोलीस तपासात त्याने वहिनीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे निष्पन्न झाले.  त्यानंतर तिचा मृतदेह पाचर्णे गावातील डोंगराजवळ पुरला. मृतदेहाची विल्हेवाट लावून आरोपीने घरी येऊन मटण पार्टी केल्याचे कबूल केले. गणेश याच्यावर अहमदनगर, चाकण, लोणीकंद, चाकण येथे गुन्हे दाखल आहेत.

लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, सहायक निरीक्षक रवींद्र गोडसे, किरण पड्याळ, अजित फरांदे, प्रतिक्षा पानसरे यांनी ही कारवाई ( Shirgaon) केली.

https://www.youtube.com/watch?v=4so19cObrrw

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.