Alandi : जल प्रदूषणाच्या समस्येचे गांभीर्य प्रशासनाने लक्षात घ्यावे – इंद्रायणी सेवा फाउंडेशन

एमपीसी न्यूज –  इंद्रायणी नदी काठच्या गावातील  मैला मिश्रित सांडपाणी ( Alandi)  तसेच कारखान्यातील केमिकल युक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट ते सांडपाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. यामुळे इंद्रायणी नदी वारंवार फेसाळलेली दिसून येत आहे.आज दि.12  रोजी आळंदी येथील सिध्दबेट जवळील बंधाऱ्या खालील नदीपात्र  फेसाळलेले होते.नदीपात्रातील पाण्यावर पांढरा शुभ्र फेस तरंगत होता.

Shirgaon : वहिनीचा खून करणाऱ्या दिराला लोणीकंद येथून अटक

या केमिकल युक्त पाण्याने स्नान केल्यास त्वचा रोग होत आहे. अंगावर जखमा होत आहे. याबाबतचा एका लहान मुलांचा व्हिडिओ  सोशल मीडियाच्या माध्यमातून( इंद्रायणी सेवा फाउंडेशन चे) विठ्ठल शिंदे यांनी विविध ठिकाणी पोस्ट केला आहे. जलप्रदूषणाबाबत ते म्हणतात ही वस्तुस्थिती आहे. इंद्रायणीची झालेली  हानी यावर सुस्त प्रशासन काहीच कारवाई करत नाही. याचे वाईट वाटत आहे. तुम्ही कधी बदलणार जीव घेतल्यावर का? याबाबत प्रशासनाने गांभीर्य लक्षात घ्यावे. दिखाऊ वृत्तीचे काम करू नका. तसेच केमिकलयुक्त पाणी बंद करा अशी मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी केली आहे.

या इंद्रायणी जलप्रदूषीत केमिकल युक्त पाण्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.जलप्रदूषणामुळे शरीरावर परिणामाचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दि.11 रोजी काल  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एका उद्घाटन सोहळा कार्यक्रमानिमित्त व गीता भक्ती अमृत महोत्सवानिमित्त  आळंदी आगमन झाले होते.तसेच त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी चे दर्शन घेतले. त्या दरम्यान इंद्रायणी नदी जलप्रदूषण या संदर्भात प्रसार माध्यमातून त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले होते गुरुवार व शुक्रवारच्या दरम्यान जलप्रदूषण वाढ होत आहे. याची तक्रार मिळाली आहे. तत्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात ( Alandi)  येईल.  ही तत्काळ कारवाई कधी होईल याकडे नागरिकांचे लक्ष आहे?

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.