Chakan : नाणेकरवाडीतून दोन वर्षांचा मुलगा गायब

एमपीसी न्यूज- नाणेकरवाडी ( चाकण, ता. खेड) येथून दोन वर्षांचा चिमुरडा मुलगा घरासमोरील अंगणातून गायब झाल्याची घटना शनिवारी (दि.२२) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. चाकण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या बाबत तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.

चिकू मिथुन राठोड ( वय 2 वर्षे, रा. नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड) असे गायब झालेल्या मुलाचे नाव असून या प्रकरणी मुलाचे वडील मिथुन शेषराव राठोड ( वय 30) यांच्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. चाकण पोलिसांनी संबंधित घराच्या लगतच्या भागात शोध सुरु केला असून सोशल माध्यमांवर संबंधित मुलाची छायाचित्रे या भागात पाठविली आहेत. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.