Wakad : शाळेत हसण्याच्या गैरसमजातून वर्गमित्राला मारहाण

एमपीसी न्यूज – वर्गात वेगळ्याच विषयावरून हशा पिकला असताना दोघा विद्यार्थ्यांना वाटले की हा हशा त्यांच्यावर होत आहे. या रागातून दोघांनी मिळून वर्ग मित्राला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 22) दुपारी वाकड येथे घडली.

पिराजी धुरपत खंकरे (रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चेतन मोहोळकर, अमोल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिराजी आणि आरोपी एकाच वर्गात शिक्षण घेत आहे. शनिवारी सकाळी वर्गामध्ये वेगळ्या विषयावरून हशा पिकला. यामध्ये आरोपींना गैरसमज झाला की, हा हशा त्यांच्यावर होत आहे. या रागातून दोघांनी मिळून पिराजी याला मारहाण केली. यामध्ये पिराजी गंभीर जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.