Chakan :अन चोरांनी मारला पोलिसांच्याच डोळ्यात मिर्चीचा स्प्रे, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – चोरीच्या इराद्याने आलेल्या चोरांना पोलिसांनी पकडण्याचा ( Chakan ) प्रयत्न केला असता चोरांनी थेट पोलिसांच्या डोळ्यात मिर्चीचा स्प्रे मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने दोन्ही चोरांना अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि.26) मध्यरात्री मेदनकरवाडी येथील बंगला वस्ती येथे घडली.

निहाल हरपाल सिंग (वय 35 रा. मुंबई), मंगेश लक्ष्मण गायकवाड  (वय 32 रा. रहाटणी) यांना अटक केली असून संजय पडवळ (नाव पत्ता माहिती नाही) हा फरार झाला आहे.याप्रकऱणी पोलीस उपनिरीक्षक अमोल डेरे यांनी फिर्याद दिली आहे.

Shirur : पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर कामांचे कार्यारंभ आदेश देण्यास सुरुवात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस गस्त घालत असताना त्यांना काही जण जबरी चोरीच्या तयारीत Chakanअसल्याचे समजले. पोलीस घटनास्थळी गेले असता आरोपी पोलिसांना पाहून टपरीच्या आड लपू लागले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी थेट मिरचीचा स्प्रे पोलिसांच्या डोळ्यात मारला.

पोलिसांनी मोठ्या शिताफीने दोघांना अटक केली तर एक जण फरार झाला. पोलिसांनी त्यांच्याकडून प्लास्टीकची पिस्टल, मिरचीचा स्प्रे, स्क्रू ड्रायव्हर जप्त केला. हे आरोपी नेमके कोठे चोरी करणार होते. त्यांचे इतर साथीदार कोणकोण आहेत याचा पुढील तपास चाकण पोलीस करत ( Chakan ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.