Charholi : चऱ्होली खुर्द सोसायटीच्या चेअरमन पदी अनिकेत कुऱ्हाडे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज : आज चऱ्होली खुर्द (Charholi ) येथील चऱ्होली खुर्द विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाची व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हा निवडणूकीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. चेअरमन पदासाठी अनिकेत साहेबराव कुऱ्हाडे यांचा एकमेव अर्ज आला होता. तर, व्हाईस चेअरमन पदासाठी शारदा पांडुरंग थोरवे यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

चेअरमन पदी अनिकेत कुऱ्हाडे, तर व्हाईस चेअरमन पदी शारदा थोरवे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

Maharashtra : अखेर 15 वर्षांनंतर महाराष्ट्राच्या कारागृहात होणार दोन हजार पदांची भरती

यावेळी नवनियुक्त चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार संचालक मंडळामार्फत करण्यात आला. आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील, आळंदी, चऱ्होलीसह इतर गावातील अनेक नागरिक व नातेवाईकांनी त्यांना त्यांच्या पद नियुक्ती बद्दल अभिनंदनासह पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी पांडुरंग पगडे, ज्योती थोरवे, शिवाजी थोरवे, राहुल थोरवे, बाळासो थोरवे, योगेश थोरवे, विष्णू थोरवे, कैलास थोरवे, राजकुमार बांगर, अतुल पवार, प्रताप थोरवे हे संचालक (Charholi ) मंडळ उपस्थित होते तर ग्रा. स. राहुल भोसले, पांडुरंग थोरवे, रामदास घोलप, धनंजय थोरवे,राजू बांगर, प्रकाश थोरवे इ.कर्मचारी सुभाष जाधव, ऋषिकेश गोडसे व इतर मान्यवर उपस्थित होते. याबाबत माहिती अनिकेत कुऱ्हाडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.