Mahashivratri : चऱ्होली येथील ग्रामदैवत वाघेश्वर महाराज मंदिरात शिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – चऱ्होली गावचे ग्रामदैवत वाघेश्वर महाराज मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांनी गर्दी ( Mahashivratri ) केली. शुक्रवारी (दि. 8) पहाटेपासून भाविकांची मंदिरात रांग लागली. महाशिवरात्री निमित्त ग्रामदैवत वाघेश्वर महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारी सकाळी भाविकांनी मंदिरात शिवाभिषेक केला. भाविकांचे शिव दर्शन झाल्यानंतर त्यांना मंदिरात देवस्थान तर्फे केळी व इतर उपवासाच्या पदार्थाचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. ग्रामस्थांनी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. मंदिर प्रशासनाकडून या मंदिराविषयीचा माहितीचा लेख लिहिण्यात आला असून तो भाविकांच्या माहितीसाठी मंदिर परिसरात लावण्यात आला आहे.

Womens Day 2024 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डीपीयू हॉस्पिटलच्या वतीने पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

चऱ्होली येथील श्री वाघेश्वर मंदिरास महानस्थळ म्हणून संबोधले जाते. दाभाडे सरकार घराण्यातील मूळ पुरुष बजाजी दाभाडे पाटील यांचे नातू कृष्णाजी दाभाडे सरकार यांनी श्री वाघेश्वर महानस्थळ हे मंदिर बांधले. इ.स.1725 मध्ये या मंदिराची उभारणी गावातील टेकडीवर झाली.

वाघेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार समस्त ग्रामस्थ चऱ्होली बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आला आहे. चऱ्होली येथील वाघेश्वर महाराज शिव मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच येथील बैलगाडा घाट देखील प्रसिद्ध आहे. चऱ्होली वाघेश्वर उत्सवावेळी येथे बैलगाडा शर्यत आयोजित केली जाते. या शर्यतीत मोठ्या प्रमाणात बैलगाडे सहभागी होत ( Mahashivratri ) असतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.