Womens Day 2024 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डीपीयू हॉस्पिटलच्या वतीने पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डीपीयू सुपर स्पेशालिटी ( Womens Day 2024)  हॉस्पिटलने पाच दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महिलांसाठी दुचाकी रॅली, वूमन प्रीमियर लीग असे उपक्रम 5 मार्च पासून राबवले जात आहेत.

पाच दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात हॉस्पिटलच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम्स गाला, त्यानंतर मिसमॅच डे आणि इव्हेंटच्या दुसऱ्या दिवशी टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटी आयोजित करण्यात आली. तिसऱ्या दिवशी सर्व महिलांसाठी मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात होती. रॅलीमध्ये 70 हून अधिक महिला कर्मचाऱ्यांनी पारंपारिक पोशाख परिधान करून भाग घेतला.

Womens Day 2024 : आंतरराष्ट्रीय महिला दिनी राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात

महिला प्रीमियर लीगसाठी देखील महिला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एक मजेशीर उपक्रम म्हणून 11 मार्च रोजी तांबोला (हौजी) खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. या खेळाची अंतिम फेरी 13 मार्च रोजी होईल. अंतिम फेरीत एक परफॉर्मिंग आर्ट स्पर्धा होईल ज्यात सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग असेल. त्यानंतर विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

या उपक्रमाच्या आयोजक डॉ. भाग्यश्री पाटील म्हणाल्या, “नारी ही माता, भगिनी, कन्या अशा विविध रूपांतून ती नारीशक्तीचे कार्य सर्वार्थाने परिपूर्ण करीत असते. स्त्रीशक्तीचा हा महिमा, संस्कार आणि माणुसकी जपत एक आदर्श शक्ती म्हणून सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. स्त्रियांमधील आत्मविश्वास हाच सर्व स्त्रियांना नवीन उभारी देणारा ठरेल. सकारात्मक वृत्ती, जिद्द, जिज्ञासू वृत्ती चांगली असेल तर यशाची शिखरे सहज गाठता येतात. महिलांनी स्वतःला कमी न लेखता अधिक सक्षम होऊन आपले समाजातील नेतृत्व असेच वृद्धिंगत ( Womens Day 2024)  करावे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.